पुणे, दि. 18 -पुण्यातील अग्रगण्य दैनिक “प्रभात’ने वाचक आणि रसिकांसाठी यंदाही “दिवाळी पहाट’ची मेजवानी आयोजित केली आहे. “पुनीत बालन ग्रुप’ यांचे मुख्य प्रायोजकत्त्व आणि “लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसा. लि.’ यांचे सहप्रायोजकत्त्व या कार्यक्रमाला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच दि. 21 ऑक्टोबर, “वसुबारस’ या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही सुरेल पहाट रंगणार आहे.
“नक्षत्रांचे देणे’ या शीर्षकाखाली आयोजित केलेला हा कार्यक्रम दि.21 ऑक्टोबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पहाटे 6 वाजता होणार आहे. संदीप उबाळे, अमृता नातू, प्राजक्ता जोशी या तीनही युवा गायक – गायिकांचे सुरेल गायन या “दिवाळी पहाट’ कार्यक्रमात होणार आहे.
हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असून, आसनासाठी आरक्षण करावे लागणार आहे. त्यासाठी 83088-32075 या मोबाइल क्रमांकावर कॉल करून प्रवेशिका आरक्षित करू शकता. याशिवाय खालील चार ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध होऊ शकतात.
येथे मिळतील प्रवेशिका
दैनिक प्रभात’, 303, नारायणपेठ, पुणे 30, – संपर्क क्रमांक – 83088-32075
“दैनिक प्रभात’, प्राईड प्लाझा, पहिला मजला, पिंपरी चौक, पिंपरी, – संपर्क क्रमांक – 99224-04909
“गांधी खादी भांडार’, सेवासदन बिल्डिंग, कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता, पुणे. – संपर्क क्रमांक – 020-24455797
“गांधी खादी भांडार’, “सांकला आर्केड’, टेलिफोन एक्स्चेंजसमोर, कर्वेरोड, नळस्टॉप, पुणे -संपर्क क्रमांक – 020 25444402