जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थांच्या पाच प्राचार्यांच्या बदल्या

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने काढले आदेश

 

पुणे – राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या पाच प्राचार्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतेच हे आदेश काढले.

करोना पार्श्‍वभूमीवर अधिकारी आपापल्या सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाचे प्रशासकीय व विनंती बदल्यांचे सत्र अधूनमधून सुरूच आहे. बरेच अधिकारी बदल्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष आदेशाकडे लागले आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांच्या बदल्या करत असताना प्रामुख्याने त्यांच्या विनंती अर्जांचा विचार केला आहे. त्यानुसारच त्यांना नवीन पदस्थापना दिली आहे. अहमदनगरचे प्राचार्य अचला जडे, चंद्रपूरचे प्राचार्य विलास पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत उपसंचालक पदावर बदली झाली आहे.

नंदुरबारचे प्राचार्य जालिंदर सावंत यांची नाशिकला प्राचार्यपदी बदली झाली. सोलापूरचे प्राचार्य ज्योती मेटे यांची सातारा येथे, तर साताऱ्या प्राचार्य रामचंद्र कोरडे यांची सोलापूर येथे प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदी बदली झाली. शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.