नाणे मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडीवडे नामाच्या विद्यार्थ्यांना श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय चिंचवड यांच्या वतीने शालेय साहित्य, नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले. शाळेतील एकूण ४० विद्यार्थी व अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप करण्यात आला.
या वेळी श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय, चिंचवड या शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला चौधरी यांचे ग्रामस्थ व शाळा समितीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. शाळेचा विकास करणे व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करावे, अशा अपेक्षा व्यवस्थापन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या वेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक गायकवाड, माजी उपसरपंच किरण गायकवाड, पोलीस पाटील रोहिणी चोपडे, सदस्य पिंकी राऊत, सीमा गायकवाड, बाबाजी गायकवाड, संगीता गायकवाड, ज्योती गायकवाड, सारिका दाभणे, पुनम दाभणे, रूपाली दाभणे, सहकारी शिक्षिका ज्योती खाडे, मुख्याध्यापक नारायण गायकवाड उपस्थित होते.