किवळे, (वार्ताहर) – साईनगर, मामुर्डी येथील ३५ वर्षांपुर्वीचा जाण्या येण्याचा सेंट्रल चौक येथील रस्ता येथील नागरिकांना पर्यायी रस्ता न देता बंद केला आहे. तो पुन्हा सुरु करावा, या मागणीसाठी फुले, शाहू, आंबेडकर व युवा सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने मुबई पुणे महामार्ग सेंट्रल चौक देहूरोड येथे रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले.
साईनगर, मामुर्डी येथील ३५ वर्षांपुर्वीचा जाण्या येण्याचा सेंट्रल चौक येथील रस्ता येथील नागरिकांना पर्यायी रस्ता न देता बंद केला आहे. तो पुन्हा सुरु करावा, याच ठिकाणी सिगनल बसवा किंवा शितळानगरच्या सर्व्हिस रस्त्याला हा रस्ता जोडावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
या वेळी पोलीस उपआयुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त मुगुटराव पाटील, उपनिरीक्षक आशिष जाधव,एल. आय. बीचे अजित सावंत, रास्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एम. डी. काजेकर यांनी या रस्त्यासाठी एका महिन्यात योग्य ती उपाय योजन करुन साईनगर मामुर्डीच्या लोकांची गैरसोय दूर केली जाईल, असे अश्वासन व लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन एक महिना स्थगित करण्यात आले.
आंदोलनाचे नेतॄत्व धर्मपाल तंतरपाळे, राजेंद्र तरस, सिंधू तंतरपाळे , ऐश्वर्या तरस यांनी केले. आंदोलनात वंदना तरस, सुनीता चांदणे, मीना ढेरे, कविता मुळीक, कविता शिंदे, कांचन पाल, सारिका सोनवणे, सीमा तंतरपाळे, मनसेचे सायबु तेलगु, नितीन भाेसले, किरण कांबळे, दिनेश माने, सुनील ननवरे, सुधीर किस्ते, मेघराज तंतरपाळे, गणेश कोडप्पा, राजेश सफारे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.