नीरा – जेऊर येथील माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना परमपूज्य सद्गुरु सांगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळामार्फत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक उत्तम धुमाळ यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. मंडळामार्फत गेली अकरा वर्ष सातत्याने विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते.
शालेय वस्तू मिळाल्याने विद्यार्थी खूश दिसत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण होते. याप्रसंगी पुरंदर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक दौलत साळुंखे, मोहन जगताप, सरपंच प्रतीक धुमाळ, अनंत तांबे, जनार्दन तांबे, माजी पोलीस पाटील यशवंत सांगळे, कांतीलाल तांबे, मुख्याध्यापक बिभीषण जाधव, कालिदास पवार, दत्तात्रय धुमाळ, श्यामराव धुमाळ, संजय सांगळे, उद्धव धुमाळ, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन घनवट व तर आभार सुरेश देशपांडे यांनी मानले.