जळोची – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या हस्ते अण्णा भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, सुनील शिंदे, साधू बल्लाळ, धनंजय तेलंगे, निलेश जाधव, किरण बोराडे यांनी केले होते. यावेळी प्रा. सुनील लोखंडे, अनिल लांडगे, टी. व्ही. मोरे, के. टी. जाधव, विक्रम लांडगे, बापू शेंडगे, अंकुश मांढरे, शहाजी मांढरे, राजू मांढरे, संजय वाघमारे, हरिचंद्र केदारी, विशाल खंडाळे आदि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.