तळेगाव ढमढेरे – सर्वत्र मकरसंक्रातीचा सण आनंदाने साजरी होत असताना, अनाथांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्याच्या वतीने अनाथांना तिळगुळ वाटप करून मकरसंक्रातीचा आनंद देण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आनंदाश्रम प्राथमिक शाळेत पत्रकार संघाच्या वतीने मुलांना तिळगुळ व चिक्की वाटप करीत मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यात आला, यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेरखान शेख, सहसचिव जालिंदर आदक, विशाल वर्पे, आयुब शेख, आनंदाश्रम प्राथमिक शाळेचे शिक्षक शंकर मुनोळी, बुधा बिऱ्हाडे, ज्ञानेश्वर लोंढे, दिलीप गायकवाड यांसह आदी उपस्थित होते, यावेळी शेरखान शेख व विशाल वर्पे यांनी मनोगत व्यक्त केले.