पळसदेव, (वार्ताहर) – पळसदेव भागातील जिल्हा परिषद शाळा माळेवाडी येथे हिंदुस्थान फिड्स प्रायव्हेट लिमिटेड व शिवकृपा ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचं मत हिंदुस्थान फिड्सचे मॅनेजर रामदास मेटकरी व मनोहर भोंडवे यांनी व्यक्त केले. यावेळी हिंदुस्थान फिड्सचे मॅनेजर रामदास मेटकरी, मनोहर भोंडवे, शिवकृपा ट्रेडर्सचे चेअरमन शंकर शिंदे, सूरज शिंदे, शिक्षक उन्मेश कुचेकर, राहुल कानगुडे यांसह पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.