तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – येथील अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त बी. एड.च्या विद्यार्थ्यांनी आपली आई व सासू यांचे पाद्यपूजन करून महिला दिन साजरा केला.
आई व लग्नानंतर सासूने पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञ भावनेतून महिला दिनानिमित्त महाविद्यालयात पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांचा जवार गट व मार्गदर्शक डॉ. संदीप गाडेकर यांचा वरई गट यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख वक्ते ॲड. किशोर ढोरे यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी डॉ. शीतल दुर्गाडे या होत्या. त्यांनी विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले.या वेळी महाविद्यालयाच्या प्र प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे, डॉ. कविता तोटे, सहा प्रा. ज्योती रणदिवे, सहा प्रा. सोनाली पाटील, डॉ. अनुप्रीया कुमारी, ग्रंथपाल सुजाता जाधव, मोहन कडू व बी. एड. व एम. एड.चे विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले व सचिव अशोक बाफना यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.