शिक्रापूर – दरेकरवाडी (ता. शिरूर) येथे काही दानशूर व्यक्तींकडून गरजू व गरीब नागरिकांना धान्य व गरजेच्या वस्तू वाटप करण्यात आले असून, सोडिअम हायड्रोक्लोराईडचे द्रावण तयार करून गावात औषध फवारणी करून संपूर्ण गाव निर्जंतुकरण करण्यात आले आहे. याबरोबरच गावातील प्रत्येक घरात सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
सणसवाडी येथील माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर वआणि आर्सलमित्तल स्टील या कंपनीच्या वतीने गावातील गरीब कुटुंबीयांना रोजच्या वापराच्या वस्तू, तसेच अन्नधान्य आणि एक वेळेच जेवण देण्यात आले आहे. यावेळी सरपंच प्रमिला दरेकर, माजी उपसरपंच हिरामण दरेकर, सणसवाडीचे माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर, आर्सलमित्तल स्टील कंपनीचे युनियन माजी अध्यक्ष राजेंद्र दरेकर, पोलीस पाटील पांडुरंग दरेकर, आरोग्य सेविका कल्याणी दीक्षित, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुनील दरेकर उपस्थित होते.