संयुक्तराष्ट्रे – संपूर्ण जगात आज करोनामुळे टाळेबंदीचा प्रसंग उद्भवला आहे. अशा काळात घरात बंदिस्त असलेल्या महिला व मुलींची अधिक दक्षतेने काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांनी सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांना केली आहे. या काळात त्यांच्या सुरक्षेचीही दक्षता घेण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवडा भरात सर्वत्र सामाजिक आणि आर्थिक अडचणी वाढल्या आहेत त्यातून घरगुती हिंसाचाराचे प्रमाणही वाढत असते त्यावर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा प्रत्येक देश या समस्येवरील उपाययोजना करील त्यावेळी त्यांनी या मुद्द्य्ाच्या अनुषंगानेही काहीं उपाययोजना करून महिलांसाठी सुरक्षित वातावरण कसे निर्माण होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.