संगमनेर -लॉकडाउनमुळे रोज मजूरीवर गुजरान करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांनी ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, रहिमपुर सरपंच बाजीराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गाढे, उपसरपंच रामदास शिंदे, पत्रकार स्वानंद चत्तर, राजेंद्र गाढे व महाराजांचे सहकारी उपस्थित होते.