पुणे/वानवडी – वानवडीत अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंगचे प्रमाण वाढल्याने परिसर विद्रुप दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, पुन्हा एकदा असे होर्डिंग जागोजागी डोकावू लागले आहेत. यातून महसूल बुडत असल्याने पालिका प्रशासने अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेतल्याशिवाय शहर, उपनगरांत कोठेही होर्डिंग उभारता येत नाही. परवाना असलेल्या होर्डिंगच्या खालील बाजूस परवाना क्रमांकाची पिवळी पाटी लावली जाते. मात्र, या ठिकाणी असलेल्या बहुतांशी होर्डिंगला अशा पाट्या नाहीत. वानवडी परिसरात पालिकेच्या या विभागाचे नियम “वेशीवर टांगून’ सर्रास होर्डिंग उभारले जात आहेत. विशेष म्हणजे अशा होर्डिंगवर गेल्या वर्षभरापासून कारवाई झाली नसल्याने फुटाफुटावर होर्डिंग उभे राहू लागले आहेत.
अनेक व्यावसायिक स्वत:च मिळेल त्या जागी मोठमोठे होर्डिंग उभारत आहेत. तसेच,
वानवडी रस्त्यावरील फातिमानगर चौकात सिग्नलजवळच मोठ्या प्रमाणत अनधिकृत होर्डिंग आहेत. कारवाई झालीच तर नुकसान नको, याकरिता असे होर्डिंग उभारताना निकृष्ट दर्जाचे लोखंडी खांब वापरले जात असल्याने ते कधीही कोसळू शकतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहन चालकांसह येथील छोट्या-मोठ्या दुकानांनाही धोका आहे.