खळद -पाच दिवसांपूर्वी सासवड येथे राहणारा मात्र मूळचा खळदचा रहिवाशी बाधित आढळला आहे. हा बाधित पंढरपूर येथे पालखी सोहळ्यासमवेत जाणार होता. त्यापूर्वी त्याने तपासणी केली होती. बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेली होती.
हा बाधित गावाच्या बाजूला असणाऱ्या एका वस्तीवर राहत आहे. कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आला नव्हता. त्याची कोणतीही प्रवासाची पार्श्वभूमी, लक्षणे दिसत नव्हती. बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी वस्तीस भेट देऊन रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्कमधील 10 नागरिकांना जेजुरी येथे कोविड केअर सेंटर येथे हलविले. लो रिस्कमध्ये 76 नागरिकांचा समावेश आहे. त्यांना घरीच विलगीकरण केले आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शुभांगी डांगे व उमेश वाघोले, मयुरी ठाणेकर, संजय महाजन, सीमा झुरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये सात पथकांची नेमणूक केली आहे. सर्वेक्षण करणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत शितोळे, डॉ. सागर डांगे यांनी दिली.