Disha Patani-Mouni Roy : अभिनेत्री दिशा पाटनी आणि मौनी रॉय (Disha Patani-Mouni Roy ) या बॉलीवूडमधील सध्याच्या BFF आहेत. अनेक कार्यक्रमांना आणि लंच, डिनरलाही या एकत्र दिसतात. अक्षय कुमारच्या वर्ल्ड टूरमध्ये ओळख झाल्यानंतर या दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्यानंतर अनेकदा दोघींना एकत्र हँगआऊट करताना पाहिलं जातं.
ख्रिसमसनिमित्त दिशा आणि तिची खास मैत्रीण मौनी थायलंड सफरीला गेले होते. या ट्रिपचे अनेक फोटो अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. या फोटोमध्ये दिशा-मौनी अतिशय हॉट दिसत होते. (Disha Patani-Mouni Roy )
View this post on Instagram
दरम्यान, नुकतंच अभिनेत्री दिशा पाटनी हिने इंस्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत. निळ्या रंगाच्या फ्लोरल बिकिनीमध्ये दिशाचा बोल्ड अंदाज खूप व्हायरल झाला आहे. यावेळी वेळी तिने काही भारतीय आणि थाई पदार्थांचा आस्वाद देखील घेतला असून, काही खास फूड डिशचे फोटो तिने शेअर केले आहेत.
बेस्ट फ्रेंड असलेल्या दोघींचे वेकेशन ट्रिपचे लेटेस्ट फोटो पाहायला मिळत असून, फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत. मौनी आणि दिशाचे अनेक चाहते आहेत आणि त्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असतात.