पुणे – विमाननगर, सिंबोयसेस कॉलेजजवळ, रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरचे स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्फोटामुळे मजुरांच्या वसाहतीमध्ये आग लागली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरामध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. या परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू होते. एकापाठोपाठ दहा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आग लागल्याचे समजतातच वसाहतीतील महिला व लहान मुले घराबाहेर पडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली गेली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एका पाठोपाठ दहा सिलेंडरचे स्फोट झाल्याने लागली आग ! पुण्यातील विमाननगरमध्ये खळबळ#Pune #Vimannagar pic.twitter.com/9mUlo32Wbt
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 27, 2023
वसाहतीतील छोट्या घरात जवळपास १०० सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.या घटनेमध्ये बांधकाम मजुरांची घरे जळाली असून गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.एका मागोमाग दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते.