मुंबई – अभिनेत्री दिशा पटानीचा (Disha Patani) सोशल मीडियावर सध्या विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र येथे तिच्याबाबत एक वेगळाच किस्सा घडला आहे. विमानतळावर सुरक्षारक्षकाने तिला प्रवेशद्वाराच्या बाहेरच अडवून ठेवले होते. कारण तिच्याकडे आयडी प्रूफ नव्हते.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिशा ती विमानतळावर दिसत आहे. आयडी प्रूफसाठी सुरक्षारक्षकांनी तिला थांबवले आणि दिशाकडे आयडी कार्डची मागणी केली होती. मात्र तिच्याकडे मूळ कागदपत्रे नव्हती. दिशानं सुरक्षारक्षकाला फोनमधून आयडी कार्ड दाखवले होते. मात्र पुढे तिला विमानतळ सुरक्षारक्षकांनी रोखले. आणि तिल ओरिजनल आधार कार्ड दाखविण्याची विनंती केली.
त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, तिच्याकडे कोणतेही बॅग नाही. ती तिच्या स्टाफकडे बॅगची मागणी करते आणि कारकडे जाते. बराचकाळ दिशाने आपले सामान तपासल्यानंतर तिला तिचे आधार कार्ड सापडले. त्यानंतर ते सुरक्षारक्षकाला दाखवून ती आत एंट्री करते. तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
यावरनेटकऱ्यांनी सुरक्षा रक्षकांनी नियमाची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. सर्वांना नियम सारखे असे काहींनी म्हंटले आहे. दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धा या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘के टीना’, ‘मलंग 2’ ‘कल्की 2898 AD’ मध्ये देखील दिसणार आहे. अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातही ती दिसणार असल्याची चर्चा आहे.