Farzi 2 : यावर्षी चित्रपटांसोबतच अनेक वेब सिरीज OTT वरही प्रदर्शित झाल्या. OTTवरील काही वेब सिरीज आहे, ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयावर आणि मनावर छाप सोडली. यापैकी एक म्हणजे शाहिद कपूर आणि विजय सेतुपती स्टारर ‘फर्जी’ ही मालिका.
अशात चाहतेही त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘Farzie 2’ ची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक नवीन अपडेट समोर येत आहे.
‘फर्जी’ मालिकेत सनीची भूमिका साकारणाऱ्या शाहिद कपूरने फर्जी 2 ची बाबत माहिती दिली. शाहिदने सांगितले की, फर्जीचा दुसरा सीझन येणार आहे. “म्हणजे, प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती. तसेच, कथा ज्या प्रकारे संपली, ती ओपन एंडेड होती, त्यामुळे नक्कीच फर्गी 2 नक्कीच येईल, या वर्षी माझे दोन रिलीज होते, म्हणून मी आता थिएटरसाठी काही गोष्टी करणार नाही, परंतु फर्जी 2 नक्कीच बनवला जाईल.
शाहिद कपूरची ‘फर्जी’ ही मालिका खूप गाजली आणि ती आठ भागांमध्ये प्रदर्शित झाली. या मालिकेत दाक्षिणात्य अभिनेते विजय सेतुपती, केके मेनन, राशि खन्ना, भुवन अरोरा, अमोल पालेकर आणि रेजिना कॅसांड्रा देखील दिसले. पहिला सीझन एका नोटवर संपला आणि पुढच्या कथेबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक होते. या वेब शोमध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता, तर शाहिद कपूरने चोराच्या भूमिकेत सर्वांनाच धक्का दिला होता. शाहिद आणि विजयने ओटीटी स्पेसमध्ये फर्जी मधून पदार्पण केले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहिद लवकरच क्रिती सेननसोबत एका अनटायटल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. शाहिद-क्रितीचा हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून त्यात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रही दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहिद आणि कृतीची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.