मुंबई – बॉलिवूडची हॉट अँड बोल्ड अभिनेत्री ‘दिशा पटानी’ सध्या मालदीवमध्ये तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच अभिनेता टायगर श्रॉफसह सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच दिशाने सुटीच्या काळात तिचे काही हॉट बिकिनी फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर अजून ही ट्रेंड होताना दिसून येतात येत आहेत.
View this post on Instagram
दिशा ट्रॅव्हलहोलीक आहे. ती नेहमी नवनवीन देशात फिरस्तीवर असते. त्या देशातील वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि महत्वाचं म्हणजे ती त्यादेशातील फोटोदेखील चाहत्यांसोबत शेेअर करत असते.
View this post on Instagram
सध्या दिशा आणि टायगर श्रॉफ न्यू इयर साजरा करण्यासाठी मालदीवला गेले असून, ते दोघेही या ठिकाणी भन्नाट एन्जॉय आणि मस्ती करत आहे. दिशाने आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर मालदीव मधील काही फोटो शेअर केले असून, तिचा हा फ्रेश लूक फॅन्सला खूप आवडला आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसून येते की, दिशा समुद्रकिनारा आणि तिथल्या वातावरणाचा आनंद घेतेय. ती इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलीय, असं वाटतंय. तसेच फोटोमध्ये दिशाने बिकिनीतल्या पोझेस देत फॅन्सला वेड लावलं आहे. दिशा गुलाबी कलरच्या बिकिनीमध्ये चेक डिझाइन श्रगमध्ये दिसतेय. दिशानं सोन्याचे कानातले घातले आहेत. या लूकमध्ये तिचा रिलॅक्स मूड दिसून येतो.