मुंबई – बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. यंदाचा बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यात विशाल निकम ठरला बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचा विजेता ठरला. विजयी झाल्यानंतर त्याच्या गावकऱ्यांनी जंगी स्वागत करत मिरवणूक काढली. विशाल निकमनेबिग बॉस मराठीच्या घरात कीर्तनकार शिवलीला पाटीलला शब्द दिला होता. तो शब्द त्याने पाळला.
त्याने घरात असतांना म्हटले होते की,’घरातून बाहेर येताच त्याने पहिली कुणाची भेट घेईल तर ती, कीर्तनकार शिवलीला पाटील हिची. दिलेल्या शब्द पाळत त्याने शिवलीला पाटीलची पंढरपुरात भेट घेतली आहे. या भेटीचा व्हिडिओ शेअर करत त्याने याबाबत सांगतले आहे. बिग बॉसच्या घरात शिवलीला पाटील हिला माऊली..माऊलू असं म्हणत असे. विशालचे आणि शिवलीलाचे घरात खास बॉन्डिंग झालं होते.
सध्या त्यांचा हा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरातून शिवलीला गेल्यानंतर विशाल अत्यंत भावुक झाला होता. दरम्यानचा व्हिडीओही सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.