‘मी खोटे सांगून बाहेर जात असेल तर मी देशद्रोही’

पुणे – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. तर पुण्यात कडक कर्फ्यू लागू केला आहे. मात्र नागरिक काही ऐकण्याच्या परिस्थितीत दिसत नाही. कोणतीही करणे देत नागरिक रस्त्यावर बाहेर पडतच आहेत. यावर तोडगा पुण्यातील एका सोसायटीने अनोखी शक्कल लढवली आहे.

पद्मावती येथील पंचवटी सोसायटीमधील सभासद खोटी कारणे देऊन बाहेर जातात. त्यामुळे सोसायटी पदाधिकारी यांनी थेट पुणेरी पाटी लावून नागरिकांना चिमटा घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर ‘मी खोटे सांगून बाहेर जात असेल तर मी देशद्रोही आहे. माझ्या आई वडिलांचे संस्कार असेच आहेत, असा आशय लिहिण्यात आला आहे. यामुळे ही पाटी येथील परिसरात नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, शहरात करोनाचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. करोनामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 37 लोक उपचाराने बरे झाले आहेत. तसेच करोनाबाधितांचा आकडा ४६४वर पोहचला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.