मुंबई – नुसरत जहाँ अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आणि खासदार आहे. सध्या नुसरत प्रेग्नंटअसल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यातच ती पती निखिल जैनपासून वेगळी राहत असल्याचाही दावा केला जात आहे.
View this post on Instagram
पण नुसरतच्या गरोदरपणाबाबत ती किंवा तिच्या टीमने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने असा दावा केला आहे की, “नुसरत जहाँ 6 महिन्यांची गर्भवती आहे. आणि धक्कादायक म्हणजे पती निखिलला याविषयी काहीच थांगपत्ता नसून हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात नसल्याचंही बोललं जातं आहे’.
View this post on Instagram
तर दुसरीकडे, नुसरत आणि भाजप नेते यश दासगुप्ता रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. मात्र, दोघांनीही या चर्चांवर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
View this post on Instagram
नुसरत जहाँ आणि निखिल जैन हे दोघे 2019 मध्ये विवाह बंधनात अडकले होते. निखिल जैन एक उद्योगपती आहे. तर नुसरत जहाँ गेल्या काही वर्षांपासून कोलकत्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. तसेच, राजकारणा बरोबरच नुसरत यांनी बंगाली सिनेसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान सुद्धा निर्माण केले आहे.
View this post on Instagram