पुणे – भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेच्या संचालिका आणि माजी अध्यक्षा शीलाताई काळे यांचे दि.17.10.2020 रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेच्या स्थापनेपासून त्या बॅंकेत कार्यरत होत्या. बॅंकेच्या संचालक पदी त्यांनी 43 वर्षे काम केले असून बॅंकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अविरत कष्ट केले. बॅंकेच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजकांना व्यक्तिश: सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या संचालक पदी 33 वर्षे कार्यरत होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत होत्या. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय भरीव कामगिरीबद्दल त्यांचा अनेक संस्थांकडून गौरव करण्यात आला.
भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेच्या सर्व संचालिका व सेवक वर्गाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.