‘या’ तारखेपर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला – हवामान विभाग

मुंबई – परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि वादळी पाऊस झाल्याने ऊस, कापूस, तांदूळ, सोयाबीनची पीकं हातातोंडाशी आली असताना अतिवृष्टीमुळे ती वाहून गेली. अनेकांचा या पावसात बळी गेला आहे. अद्यापही परतीचा पाऊस परतलेला नाही. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 21 ऑक्टोबर पर्यंत  पावसाची रिपरिप सुरू असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अरबी समुद्रासह बंगालच्या खाडीतील हवामानात सतत बदल होत आहेत. त्यामुळे पाऊस आणखी काही दिवस बरसण्याची चिन्ह आहेत. त्यानुसार राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

विदर्भ, कोकण, गोवा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. पाऊस अजून काही दिवस असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.