पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रोपवाटिकेतून चंदनाची पाच झाडे चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना प्राधिकरणातील महापालिकेच्या मध्यवर्ती रोप वाटिका येथे गुरुवारी (दि. 15) पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली. गणपत नारायण खुळे (वय 58, रा. जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. 16) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी खुळे हे प्राधिकरण पेठ क्रमांक 27 मधील महापालिकेच्या मध्यवर्ती रोप वाटिकेत नोकरी करतात. गुरुवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी मध्यवर्ती रोप वाटिकेतील चार हजार रुपये किंमतीची पाच चंदनाची झाडे चोरून नेली. सहायक पोलीस उपनिरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी याबाबत अधिक तपास करीत आहेत