दिनेश कार्तिक उपयुक्त ठरेल – नयन मोंगिया

नवी दिल्ली – ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकची विश्‍वचषक स्पर्धेसाठीच्या संघात निवड झाल्या बाबत बोलताना नयन मोंगियाने दिनेश कार्तिकची बाजु घेतली असुन त्याने निवड समितीचा निर्णय योग्य असल्याचे सांगीतले आहे.

यावेळी तो म्हणाला की, महेंद्रसिंग धोनी असताना दिनेश कार्तिकला संघात जागा मिळणे कठीण आहे. मात्र, धोनीला दुखापत झाल्यास दिनेश कार्तिकला संघात जागा मिळू शकते. कार्तिकला संधी मिळाल्यास तो चांगला खेळ करू शकतो, असा विश्वास मोंगियाने व्यक्त केला असुन जरी यंदा ऋषभ पंतला संघात स्थान मिळाले नसले तरी त्याच्यात प्रतिभेची कोणतीही कमतरता नसल्याचे सांगत त्याचे भविष्य उज्वल असल्याचेही भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदज नयन मोंगियाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.