#ICCWorldCup2019 : पोलार्ड, ब्राव्हो विंडीजच्या राखीव संघात

जमैका – आगामी विश्‍वचषक स्पर्धेत जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली विंडीजचा स्पर्धा विजयाच्या निर्धाराने इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी विंडीजने त्यांच्या 10 राखीव सदस्यांची नावे रविवारी जाहीर केली. आश्‍चर्याची बाब म्हणजे गेली दोन वर्ष राष्ट्रीय एकदिवसीय संघातून बाहेर असलेल्या कायरन पॉलार्ड आणि ड्‌वेन ब्राव्हा यांचे नाव त्या राखीव खेळाडूंमध्ये आहे. त्यांच्याशिवाय तिरंगी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सुनील अँब्रीसलाही स्थान देण्यात आले आहे.

वेस्ट इंडिजने वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात पोलार्डला स्थान देण्यात आलेले नव्हते. मात्र, अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या 32 वर्षीय पोलार्डला संघात स्थान मिळू शकते. विंडीज संघाच्या निवड समितीचे प्रमुख रॉबर्ड हायनेस यांनी दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी पोलार्डच्या नावाची शिफारस केली आहे. पोलार्डच्या समावेशामुळे विंडीजची ताकद वाढणार आहे. आंद्रे रसेल, एव्हीन लुईस, ख्रिस गेल आणि शाय होप यांना पोलार्ड व ब्राव्होची साथ मिळाल्यास विंडीजला रोखणे कठीण होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×