मुंबई – बॉलीवूड आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता दिलजीत दोसांझ आता त्या भारतीय कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, जे इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये झळकले आहेत. दिलजीत दोसांझ हा लवकरच हॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
हॉलीवूडमधील दिग्गज कलाकार असलेल्या “फेबल्स’ या ऍनिमेटेड सीरिजसाठी दिलजीत दोसांझला करारबद्ध करण्यात आले आहे. या चित्रपटात तो आपला आवाज देणार आहे.
या चित्रपटामध्ये रिकी गॅरवाइस, जॅमाइन क्लेमॅंट, नताश लियॉन, जॅबी स्मूव, रोमन ग्रिफीन डेव्हिस, ऍलेक्सा डॅमी आणि जॅच वुड्स यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे.
या सीरिजमध्ये काम करणार असल्याने दिलजीतने आपला आनंद चाहत्यांशी शेअर केला आहे. यासंबंधी त्याने एक न्यूज आर्टिकल शेअर केले आहे. यासोबत त्याने पंजाबी भाषेत कॅप्शनमध्ये लिहिले की, “फेबल्स आ रिहा ओए’.
दरम्यान, “फेबल्स’ हा ब्रॉन डिजिटलचा पहिला ऍनिमेटेड व्हेंचर आहे, जो बॅनरच्या ऍनिमेशन सेगमेंटला लॉन्च करणार आहे. या व्हेंचरमध्ये “द टोर्टोइज ऍण्ड द हेयर’, “द लायन ऍण्ड द माउस’ आणि “द बॉय हू क्राय वुल्फ’ यांसारख्या कथा आधुनिक पद्धतीने दाखविणार आहे.