पुणे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत पुण्याने पुन्हा एकादा झेप घेतली आहे. देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे. मागील वर्षी पुणे शहर 17 व्या क्रमांकावर होते. दरम्यान, देशात पुन्हा एकदा इंदोर ने बाजी पटकावर स्वच्छ शहरात पहिला क्रमांक पटकावला असून दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा, चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई असून पाचव्या क्रमांकावर पुण्याने झेप घेतली आहे. 10 लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या 48 प्रमुख शहरांचा या सर्वेक्षणात समावेश होता.