मुंबई – हॉलिवूड स्टार आणि अॅक्शन हिरो ब्रूस विलिसने आपल्या अभिनय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. मार्च 2022 मध्ये, ब्रूसच्या कुटुंबाने ‘अॅफेसिया’ निदान रोगाविषयी माहिती दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ब्रूसला नव्या आजराची लागण झाल्याचे समोर आले आहे. ‘फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया’ असे या आजाराचे नाव आहे. ब्रूसच्या कुटुंबीयांनी गुरुवारी त्याच्या आजाराबाबत माहिती दिली.
एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ब्रूस विलिसच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ‘वर्ष 2022 मध्ये, ब्रूसला एका मोठ्या विकाराचा त्रास असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला आणखी एका आजराने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.यामुळे ब्रुसशी संवाद साधने कठीण होत चालले असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.तसेच अभिनेत्याच्या सोशल मीडियावरून देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे चाहत्यांची चिंता चांगलीच वाढली आहे.
ब्रूसने 1980 मध्ये त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या चित्रपट कारकिर्दीत, ब्रूस विलिसने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु 1988 मध्ये जॉन मॅकक्लेनच्या ‘डाय हार्ड’ चित्रपटामुळे त्यांची खऱ्या अर्थाने ओळख झाली. हा चित्रपट विलिसचा पहिला मोठा फ्रेंचाइजी ठरला. ब्रूसने हॉलिवूडची प्रसिद्ध सिरीज फ्रेड्समध्ये देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. ब्रूसला त्याच्या 4 दशकांच्या कारकिर्दीत 2 एमी पुरस्कार मिळाले आहेत.