मुंबई – हॉलिवूड स्टार अरनॉल्ड श्वार्झनेगर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. अभिनेत्यापेक्षाही बॉडी बिल्डर अशी अरनॉल्डची ओळख आहे. जगभरातील कदाचितच अशी एखादी जिम असेल जिथं अरनॉल्डचा फोटो नसेल. अरनॉल्ड आपल्या फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. फिटनेसमुळेच त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. सध्या अरनॉल्डच्या जीवनावर आधारित माहितीपट येणार आहे. ज्यामध्ये अरनॉल्डने आपल्या अफेअरबाबत विस्तृतपणे सांगितल्याचे समजते.
75 वर्षीय अभिनेता आगामी तीन भागांच्या डॉक्युमेंट्री ‘अरनॉल्ड’ मध्ये त्याच्या जीवनाची अनेक गोष्टी सांगताना दिसणार आहे.हा आगळावेगळा माहितीपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात अरनॉल्ड आपल्या अफेअरबाबत खुलासा केला आहे. अरनॉल्डवर आधारित या डॉक्युमेंट्रीचे काही प्रोमो देखील चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. लवकरच याचे सर्व भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
अरनॉल्डने 1996 मध्ये मारिया श्राइव्हरशी लग्न केले होते. आता त्याने घरकाम करणार्या मेडसोबत झालेल्या अफेअरबद्दल खुलासा केला आहे. एवढेच नाही मेडकडून अरनॉल्डला एक मुलगी देखील झाल्याचे यावेळी त्याने सांगितले आहे. लग्नानंतर काही काळातच अरनॉल्डची पत्नी गरोदर होती विशेष म्हणजे त्याच काळात त्याची मेडही गरोदर असलयाचे त्याने यावेळी सांगितले आहे.
पत्नीच्या डिलिव्हरीनंतर पाच दिवसांनी अरनॉल्डची डिलिव्हरी झाल्याचे त्याने सांगितले आहे. पत्नीला मुलगा तर मेडला मुलगी झाल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले. तसेच या सर्व कारणामुळे त्या दोघींना खूप वेदना सहन कराव्या लागल्या असलयाचे देखील अभिनेत्याने सांगितले.
आपल्या मजबूत शरीरामुळे सलग 8 वेळा मिस्टर युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या अरनॉल्डने आपल्या अफेअरचे रहस्य उलगडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अरनॉल्ड बॉडी बिल्डिंगपासून सुरु केलेल्या करिअरला ‘टर्मिनेटर’ या चित्रपटांच्या सिरीजमुळे मोठी कलाटणी मिळाली होती. या चित्रपटामुळे तो जगभरातील कानाकोपऱ्यात पोहचला होता.