मुंबई – हिंदी सिनेसृष्टीतील झक्कास अभिनेते ‘अनिल कपूर’ यांचा उत्साह आजच्या तरुण कलाकारांना लाजवेल असाच आहे. वयाची 60 ओलांडल्यानंतर आजही अनिल कपूर चिरतरुण असल्याचेप्रमाणे भासतात. अनिल आपल्या फिटनेसबाबत खूप सिरीयस असतात, परंतु त्यांचा नवा लुक पूर्वीपेक्षा जास्त फिट आहे.
नुकतंच सोशल मीडियावर अनिल कपूर यांचे काही शर्टलेस फोटो व्हायरल झाले आहेत. हा फोटो पाहून भल्या भल्यांनाही आश्चर्य वाटेल अशी त्यांची शरिरयष्टी आहे.
80 आणि 90 च्या दशकात त्यावेळी अनिल कपूर जसे दिसायचे तीच तारुण्याची झळाळी आजही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत. सध्या सगळीकडेच अनिल यांच्या शर्टलेस फोटोंची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आजवर अनिल कपूर यांनी विविध चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत चित्रपट रसिकांचे मनोरंजन केले आहे.