…अन् सुशांतच्या फॅन्सकडून अंकिता झाली ट्रोल

पाटणा – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशीवेळी पोलिसांकडून अंकिता लोखंडेचीही चौकशी करण्यात आली. मात्र आता नेटकऱ्यांनी अंकिताला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Beauty is not in the face , Beauty is a light In the heart .❤️ #shooting #jwellery

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह झाली आहे. ती आपले ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता ‘हवा के झोंके आज मौंसमों से रुठ गए’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ‘साडी, डान्स आणि सुंदर गाणं’, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे, मात्र तिला या व्हिडियोवरून चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

सुशांतला न्याय मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी अंकिता इतक्या लवकर सगळं कसं काय विसरली असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. ‘७ वर्षांचं प्रेम इतक्या सहजासहजी विसरलीस कसं असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे’. तर ‘तुझ्यापेक्षा सुशांतचे चाहते आहेत, जे त्याला अजूनही विसरु शकत नाहीयेत’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.