मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती असून या निमित्ताने सर्वच स्तरातून आज त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. मात्र, अश्यातच एक ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून यामुळे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना आपल्या आजोबांचा विसर पडला की काय? असा प्रश्नं सध्या उपस्थित केला जात आहे.
झालं असं की.., आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा “स्मृतिदिन” असा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवेसनाप्रमुखांच्या नातवाला आजोबांची जयंती की स्मृती दिन असा संभ्रम कसा काय पडू शकतो असा प्रश्नं सध्या राजकिय वर्तुळात विचारला जातोय.
मात्र, काही वेळा नंतर आदित्य ठाकरे यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी ट्विटर अकांऊटवरून ही पोस्ट डिलिट केली आहे. पण आधीच ट्विट केलेल्या या पोस्टचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी आता त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जुनं ट्वीट डिलीट करण्यात आलं आणि नंतर नव्या ट्वीटमध्ये चूक दुरुस्त करून बाळासाहेब ठाकरेंची “जयंती’ असल्याचं ट्वीट केलं गेलं.