‘सोनाली कुलकर्णी’चे झाले लग्न?

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच ‘सोनाली कुलकर्णी’ वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, यावेळी कोणत्याही चित्रपटासाठी नसून इंस्टाग्रामच्या एका फोटोवरून सोनालीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहेत. या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णीने मराठमोळा लूक केला असून मंगळसूत्र चक्क उलटे घातले आहे.

सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गुलाबी रंगाची साडी, दागदागिने, नथ आणि मंगळसूत्र घातलेले दिसत आहे. या फोटोवर एका चाहतीने तुमचे मंगळसूत्र उलटे आहे, अशी कमेंट केली. यावर सोनालीने लग्नानंतर काही दिवस उलटेच मंगळसूत्र घालतात, असे उत्तर त्या चाहतीला दिले. सोनालीच्या या उत्तरामुळे तिचे लग्न झालं का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

दरम्यान, काही दिवसांपासून सोनालीच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. कुणाल बेनोडेकर या व्यक्तीशी तिचे नावही जोडण्यात आले होते. परंतु, सोनालीने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.

 

View this post on Instagram

 

@tanishqjewellery #bts Styled by @sayali_vidya Outfit @chameeandpalak MUA @malcolmfernz_official Hair @leenaofficials

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.