मुंबई – महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय कोणालाही पुसटशी कल्पनाही न देता घेतला. त्याने ड्रेसिंगरूममध्ये आमची सर्व खेळाडूंशी चर्चा सुरू होती तेव्हाच त्याने अचानक आपला निर्णय सर्वांना सांगितला.
त्याच्या या निर्णयामुळे माझ्यासह सगळ्यांनाच धक्का बसला, असा खुलासा भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे. त्यांचा बीसीसीआयशी असलेला करार संपल्यावर आता गेल्या काही दिवस ते सातत्याने नवनवे खुलासे करत आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे संघ व्यवस्थापक असलेल्या शास्त्री यांनी सांगितले की, सामना बरोबरीत सुटल्यानंतर धोनी माझ्याकडे आला होता आणि मला सांगितले की त्याला ड्रेसिंग रूममध्ये संघाशी चर्चा करायची आहे.
त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. तेव्हा खेळाडूंना मोठा धक्क बसला होता. त्याने हा निर्णय घेताना खूपच घाई केल्याचे मला वाटते, असेही शास्त्री म्हणाले.