MS Dhoni in IPL Most Runs For CSK : आज चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर #CSKvRCB आमनेसामने असतील. आयपीएल 2023 चा हा पहिला सामना असेल. त्याचबरोबर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे. महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आतापर्यंत 4 हजार 957 धावा केल्या आहेत. अवघ्या 43 धावा केल्यानंतर माही 5 हजार धावांचा टप्पा गाठेल. आज धोनीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हा इतिहास रचण्याची संधी असेल.
आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जसाठी 5 हजार धावा करणारा सुरेश रैना एकमेव फलंदाज आहे. सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जसाठी 5 हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी 43 धावा केल्यानंतर 5 हजार धावांचा आकडा गाठेल. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जसाठी 5 हजार धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरेल. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त धोनी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग राहिलेला आहे. धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून 2 हंगाम खेळला.
महेंद्रसिंग धोनीची आयपीएल कारकीर्द…
महेंद्रसिंग धोनीची गणना आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये केली जाते. धोनीला शेवटच्या षटकांमध्ये रोखणे हे विरोधी गोलंदाजांसमोर मोठे आव्हान आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
धोनीशिवाय रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.