Stock Market: आठवड्यातील शेवटचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी दिलासा देणारे ठरले. आयटी समभागांमध्ये जोरदार विक्री होऊनही भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला. यामध्ये बँकिंग, ऑटो आणि फार्मा शेअर्सचा मोठा वाटा आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदी झाली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 190.75 अंकांच्या उसळीसह 72,831.94 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 84.80 अंकांच्या उसळीसह 22,096.75 अंकांवर बंद झाला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ –
आजच्या व्यवहारात बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजार मूल्य 382.13 लाख कोटी रुपये झाले जे गेल्या सत्रात 380 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात 2.13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, आज एकूण 3906 समभागांचे व्यवहार झाले ज्यामध्ये 2431 समभाग वाढीसह बंद झाले तर 1375 समभाग तोट्यासह बंद झाले. 100 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
क्षेत्राची स्थिती –
आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, धातू, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस समभाग मजबूत वाढीसह बंद झाले. मात्र आयटी समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक 838 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 37 शेअर्स वाढीसह आणि 13 तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 21 समभाग वाढीसह आणि 9 समभाग घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे वाढलेले शेअर्स –
मारुती सुझूकी 3.55 टक्के, सन फार्मा 2.77 टक्के, टायटन 2.21 टक्के, आयटीसी 1.71 टक्के, इंडसइंड बॅंकचे शेअर्स 1.70 टक्क्यांनी वाढले.
सेन्सेक्सचे घसरलेले शेअर्स –
इन्फोसिस 2.98 टक्के, विप्रो 2.73 टक्के, एचसीएल टेक 2.46 टक्के, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 1.53 टक्के, टे महिंद्राचे शेअर्स 1.33 टक्क्यांनी घसरले.