नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आयपीएल स्पर्धेत खेळत असला तरीही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल, अशी भविष्यवाणी पाकिस्तानचा माजी कसोटीपटू दानिश कनेरिया याने केली आहे.
कनेरियाने यापूर्वी केलेले काही अंदाज व भविष्यवाणी खरी ठरल्याने आता धोनीच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
सोशल मीडियावरही त्यावर मते व्यक्त होत आहेत. धोनी भविष्यात समालोचक होण्यापेक्षा प्रशिक्षक होइल, असेही कनेरियाने म्हटले आहे.
आयपीएलमध्ये धोनीचा चेन्नई सुपकिंग्ज संघ सरस कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून धोनी आणखी किमान दोन वर्षे खेळेल पण खेळण्याबरोबरच तो प्रशिक्षकाच्याही भूमिकेत दिसेल, असेही कनेरियाने सांगितले. यावर धोनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.