Danish Kaneria : अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त सर्वत्र उत्साहचे वातावरण सुरू आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त वेगवेगळ्या मार्गाने या सोहळ्यासाठी लोक उपस्थित राहणार आहे. केवळ भारतातच नाही जगातील कानाकोपऱ्यात या सोहळ्यासाठी लोक उत्सुक असल्याचे दिसत आहे. यातच आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
गुरुवारी राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्येही राम मंदिराचा उत्साह दिसून येत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने रामलल्लाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दानिश कनेरियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझे रामलला विराजमान झाले आहेत”, असे त्याने प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो शेअर करत म्हटले.
मेरे रामलला विराजमान हो गए 😍 pic.twitter.com/mZX1jpLlT9
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 19, 2024
परंतु कनेरियानेच्या पोस्टनंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. फहीम नावाच्या व्यक्तीने कनेरियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहले, ‘चोर कधीच मालिक बनू शकत नाही.’ यासोबत त्याने बाबरी मशीद पाडल्याचा फोटो शेअर केला होता. यावर कनेरियानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि म्हटले, ‘त्यामुळेच आता त्याच्या हक्काच्या मालकांनी बाबराकडून त्यांचे मंदिर परत घेतले.’
दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेतया पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना २२ तारखेनंतर दर्शनाला येण्याचे आवाहन केले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आतापर्यंत सुमारे सात हजार विशेष लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात क्रिकेटपटूंशिवाय चित्रपटसृष्टीतील व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे