Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम लल्ला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. याशिवाय सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती.
या मंदिर सोहळ्याचा उत्सव भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळाला. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया देखील अयोध्येच्या मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणाचा सोहळा साजरा केला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सोमवारी सकाळी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासह आणि इतरांसह राम मंदिर साजरा करताना दिसत आहे.
कनेरियाने शेअर केलेलल्या व्हिडिओमध्ये स्पिनर त्याच्या पत्नीसह अयोध्या मंदिरात राम लल्लाचा अभिषेक साजरा करताना दिसत आहे. दानिश कनेरिया यावेळी म्हणाले की, “अनेक वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली, वचन पूर्ण झाले, जीवनाचा पवित्रा पूर्ण झाला.”
Jai Shree Ram 🙏🙏❤️❤️ pic.twitter.com/vcowGg8fYj
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 22, 2024
Jai Shree Ram 🙏🙏❤️❤️ pic.twitter.com/vcowGg8fYj
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 22, 2024
काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर प्रभू रामचा फोटो शेअर करताना ‘माझे रामलल्ला विराजमान झाले’ असे म्हंटले होते. सध्या त्याने साजरा केलेला रामलल्ला सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूर्ण
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला. हा सोहळा देश-विदेशातील लाखो राम भक्तांनी पाहिला. प्राणप्रतिष्ठा प्रसंगी लष्कराच्या हेलिकॉप्टरने नव्याने बांधलेल्या रामजन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अयोध्या धाममध्ये श्री राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अलौकिक क्षण सर्वांना भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणे मला खूप आनंददायी आहे. जय सियाराम!”