मुंबई – राज्यात प्रचंड पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पुरामुळे अनेकांच्या संसाराची वाताहत झाली आहे. आता या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर आला आहे. यावरून आता केंद्र सरकारच्या मदतीसाठी राज्यातील नेते प्रयत्नशील दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 701 कोटीची मदत मंजूर केली आहे. मात्र ही मदत मागच्या वर्षी आलेल्या पुरात ज्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे आताच्या पूरग्रस्तांसाठी काय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे.
ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळं पूर्वी झालेल्या नुकसानीपोटी राज्याच्या मागणीच्या काही अंशी (७०१ कोटी ₹) मदत केल्याबद्दल केंद्राचे आभार! पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोकण, प. महाराष्ट्र व विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून २०० हून अधिक लोकांचा बळी गेला. मोठ्या प्रमाणात पशुधनही आणि हजारो कुटुंबांचा संसार वाहून गेला. त्यांना उभं करण्यासाठी राज्य सरकार काम करतंय. मात्र केंद्राचीही मदत आवश्यक असल्याचे रोहित यांनी म्हटलं.
अतिवृष्टीमुळं पूर्वी झालेल्या नुकसानीपोटी राज्याच्या मागणीच्या काही अंशी (७०१ कोटी ₹) मदत केल्याबद्दल केंद्राचे आभार! पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोकण, प. महाराष्ट्र व विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून २०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात पशुधनही वाहून गेलं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 28, 2021
तसंच हजारो कुटुंबांचा संसार वाहून गेला. त्यांना उभं करण्यासाठी राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे. तौक्ते चक्रीवादळात केंद्र सरकारने गुजरातला तातडीने १ हजार कोटी ₹ दिले,त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी, ही विनंती आणि ती मिळेल असा विश्वास आहे.@PMOIndia
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 28, 2021
दरम्यान तौक्ते चक्रीवादळात केंद्र सरकारने गुजरातला तातडीने १ हजार कोटी रुपये दिले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी, ही विनंती आणि ती मिळेल असा विश्वास आहे, रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.