दुबई – महेंद्रसिंह धोनीने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आपल्या नेहमीच्याच अंदाजाने फलंदाजी केली. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धोनीच्या फलंदाजीवरून खूप टीका झाली होती, धोनीने त्याच्याच शैलीत या टीकेला उत्तर दिले.
यानंतर क्रिकेट विश्वातून धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भरतीय संघ तसेच रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने, …आणि राजा परतला, अशा शब्दात धोनीचे कौतुक केले तसेच त्याच्यातील महान खेळाडूला नमनही केले.
दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर विजय मिळवला. या सामन्यात धोनीने अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीने आपणच बेस्ट फिनिशर असल्याचे दाखवून दिले.
केवळ कोहलीच नव्हे तर रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा, हर्षा भोगले, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा यांनीही, माही है तो मुमकीन है, अशा शब्दात धोनीच्या महानतेला सलाम केला.