MS Dhoni IPL 2024 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने T20 क्रिकेटमध्ये आणखी एक विशेष कामगिरी केली आहे. IPL 2024 मध्ये दिल्ली विरुद्ध पृथ्वी शॉचा झेल घेत धोनीने T20 क्रिकेटमधली किपर म्हणून 300 वा बळी घेतला. विकेटच्या मागे 300 बळी घेणारा तो जगातील पहिला किपर ठरला आहे.
आयपीएल 2024 च्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची लढत झाली. विशाखापट्टणममध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. | MS Dhoni IPL 2024
पृथ्वी शॉचा 300 वा बळी
डेव्हिड वॉर्नरला बाद करून मुस्तफिजूरने ही भागीदारी तोडली. पाथीरानाने वॉर्नरचा झेल घेतला. यामुळे जडेजाने पृथ्वी शॉला धोनीकरवी झेलबाद केले. पृथ्वीचा झेल घेताच धोनीने इतिहास रचला. T20 मध्ये स्टॅम्प्सच्या मागे 300 बळी घेणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरला. | MS Dhoni IPL 2024
T20 मध्ये यष्टिरक्षकाने सर्वाधिक बळी
300 – एमएस धोनी*
274 – कामरान अकमल
274 – दिनेश कार्तिक
270 – क्विंटन डी कॉक
209 – जोस बटलर
First wicketkeeper to complete 3️⃣0️⃣0️⃣ dismissals in T20 cricket
Thala for a reason 😎#DCvCSK #JioCinemaSports #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/Cqv9kFQwCv
— JioCinema (@JioCinema) March 31, 2024
या यादीत पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिनेश कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंग धोनीने आयपीएल सुरू होण्यापूर्वीच सीएसकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद देण्यात आले आहे.