पुणे : खराडी येथील ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्सचे क्षितीज २०२० स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे वाचवा पर्यावरणाचे रक्षण करा… टाकाऊपासून टिकाऊची निर्मिती करा…हम सब एक है….विविधतेत एकता असे सामाजिक संदेश देत बहारदार नृत्याविष्कार सादर केला.
यावेळी मुलगी जन्माला आल्यावर विनामूल्य प्रसूती करणारे आणि बेटी बचाओ बेटी पढाओ हे ब्रिद वाक्य सार्थ करणारे डॉ. गणेश राख, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर उल्हास ढोले पाटील, सचिव उमा ढोले पाटील, प्राचार्या डॉ. अनुराधा अय्यर उपस्थित होते.
सांस्कृतिक, क्रीडा, कला या उपक्रमांमध्ये आपला सहभाग घेच विविध गुणांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेळी करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी ग्लोबल थीमला अनुसरुन समुह नृत्य व फॅशन शो सादर केला. प्रा. राहूल काळे, प्रा. ज्योती वाकचौरे, प्रा. प्राची सिंग, प्रा. विद्या हेंद्रे, प्रा. रुतुजा अवटे, प्रा. जलजा श्रीराम आणि प्रा. ज्योती महोश्वरी यांनी परिश्रम घेतले.