शाळेतल्या पहिल्या दिवसापासून आपल्याला सुविचारांची ओळख झालेली असते. थोरा-मोठ्यांनी लिहिलेल्या ओळी कधी प्रेरणा द्यायच्या तर कधी शिकवण…जरा मोठे झालो आपण आणि कोटस गुगलबाबावर शोधू लागलो. आईनस्टाईन, शेक्सपिअर, डॉ. कलाम यांचे कोटस आपण वाचू लागलो. मेसेज/स्टेटस् मध्ये वापरून आपण त्यांच्या शब्दांना/विचारांना जिवंत ठेवलं. कुतूहल म्हणून कधीतरी आपण पण विचार केला असेल हे वाक्य, या ओळी कश्या सुचत असतील. आपण पण लिहू शकतो का कधी? तर याचं उत्तर हो असं आहे. तेही तुमच्या हातात असलेल्या मोबाईल मधून… गुगल प्ले स्टोर वर तुम्हांला कोट्स लिहिण्यासाठी खूप ऍप मिळतील. यातलेच एक युअरकोट हे ऍप. बंगलोर स्थित स्टार्टअप कंपनीने हे ऍप बनवलं आहे. तुम्हांला लिहायची आवड असेल तर पेन पेपर मिळेपर्यंत आपण विसरून जातो. हातात नेहमी असणाऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही लगेच तुमचे विचार लिहू शकता आणि तुम्हांला हव्या त्या वॉलपेपरवर पोस्ट करू शकता. झाले तुमचे कोट्स तयार आणि हो मजेशीर गोष्ट म्हणजे हे कोट्स तुम्ही सोशल मीडियावर लगेच शेअर करू शकता आणि गुगल बाबावरही पाहू शकता. आहे ना भन्नाट… तेही फुकटच. इथे तुम्ही तुमच्या सारख्याच अनेक होतकरू लेखकांचे कोट्स वाचूहि शकता आणि प्रतिक्रिया हि देऊ शकता. आणखी एक युअरकोट मधून तुम्ही तुमचे स्पेशल कोट्स चे पुस्तक बनवू शकता… कॉफी मग, कॅलेंडर यांवर ही तुमचे कोट्स प्रिंट करू शकता. हे मात्र फुकट नाही हा…!!!
– प्रशांत खोत