Dhirendra Shastri : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काही दिवसापूर्वी मुस्लिम तरुणांना आवाहन केले की त्यांनी मशिदींवर आपला ताबा ठेवावा कारण त्यांच्या विरोधात षडयंत्र सुरू आहेत. ओवेसींच्या या वक्तव्यावर बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पलटवार केला आहे. याविषयी बोलताना असदुद्दीन ओवेसी यांची देव करो आणि त्यांची भीती तशीच राहो”असे त्यांनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी ओवैसी यांच्या मशिदीवरील आणि राम मंदिरावरील वक्तव्याचा समाचार घेतला. याविषयी बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी, ‘ असदुद्दीन ओवेसीमध्ये असलेली ही भीती ते किती कमकुवत आणि किती क्रूर आहेत हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले आहे. मशिदी पाडून मंदिरे बांधायची असती तर मशिदींऐवजी पुरोहितांनीच मंदिरे बांधली असती, असे म्हणत ओवैसी यांच्यावर निशाणा साधला.
#WATCH | On the statement of AIMIM chief Asaduddin Owaisi, Bageshwar Dham’s Dhirendra Shastri says, “…This just shows his fear…We don’t want to build temples on Masjids but want to reconstruct temples…” pic.twitter.com/qSfNq5DCDe
— ANI (@ANI) January 5, 2024
पुढे ते म्हणाले, ‘आम्हाला मशिदींवर मंदिरे बांधायची नाही, जिथे मंदिरे होती तिथे पुन्हा मंदिरे बांधायची आहेत. आता त्यांच्या मनात ही भीती असेल, तर देव करो अन् त्यांची भीती तशीच कायम राहो अशी मी प्रार्थना करतो” असे म्हणत ओवैसींना टोला लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी, ‘युवकांनो, मी तुम्हाला सांगतोय की आम्ही आमच्या मशिदी कशा गमावल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय होत आहे. तुम्हाला याचे दुःख होत नाही का?’ ‘ज्या ठिकाणी आपण ५०० वर्षे बसून कुराण पठण केले ते आज आपल्या हातात नाही. तरुणांनो, आणखी तीन-चार मशिदींबाबत षडयंत्र सुरू आहे, हे दिसत नाही का?” असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला होता.