धीराने घे उद्याचा दिवस तुझाच आहे.!

काळ थोडा कठीण आहे, वेळ थोडी वाईट आहे.

जिंकला तुझा प्राण आहे, हरला तुझा अहंकार आहे.

घड्याळाची टिक टिक आज देखील चालू आहे, पण आम्ही मात्र थांबलो आहे.

देवाची मंदिरे दवाखान्याच्या स्वरूपात चालू आहेत अन स्वतः मात्र तो डॉक्टर व पोलिसांच्या रूपात विठ्ठला सारखा उभा आहे.

मी आज घरात आहे, पण प्रशासनाचे कर्मचारी जीव मुठीत घेऊन आमच्या सेवेसाठी दारात आहेत.

अन्नदाता शेतकरी कालही शेतात राबत होता, आणि आजही तो बांधावर आहे.

जग आत्ता थांबले आहे कारण मानवते विरुद्ध तिसरे महायुद्ध सुरु झालेले आहे, परंतू शत्रू मात्र अदृश्य आहे.

आशा करू अंत त्याचा जवळ आला आहे, त्यासाठी तू आज घरात बसने बंधनकारक आहे.

धीराने घे, हे दिवस देखील जातील आज नाही जिंकलास तरी, उद्याचा दिवस मात्र तुझाच असेल…

World Fight Against Corona…Stay at Home..Stay Safe.🙏🙏

– तेजस भ. विधाते, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.