दिल्ली : नागरिकता कायदा दुरुस्ती विधेयकच्या विरोधात दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी सोमवारी सकाळपासूनच निषेध करीत आहेत. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील अत्याचाराबाबत दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी सकाळपासूनच धरणे आंदोलना करीत आहेत.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलिस जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहे. सरकारने पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी दिल्लोय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसह बळाचा वापर केला.
जामिया येथील विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करीत आहे. रविवारी सायंकाळी जामियामध्ये हिंसाचार झाला होता. दिल्ली पोलिसांना विद्यार्थ्यांर लाठीमार करावा होता. या प्रकरणी उत्तर जिल्हा डीसीपी मोनिका भारद्वाज यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पोलिसांनी कोणत्याही विद्यार्थ्याला मारहाण केली नाही. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पोलिस विद्यार्थ्यांवर मारहाण असलं,असल्याचे दिसत आहे.
दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी जामियाच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ निषेध करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की दिल्ली पोलिस अशा प्रकारे शांततेत निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करु शकत नाहीत. रविवारी दिल्ली पोलिसांनी ग्रंथालयाच्या आत जाऊन विद्यार्थ्यांची मारहाण केल्याचा आरोप त्यानी पोलिसांवर केला .