लखनौ: उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्ली कोर्टाने सोमवारी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना बलात्कार आणि अपहरण प्रकरणी दोषी ठरवले. तिस हजारी कोर्टाने 10 डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. सेंगर आणि त्याच्या साथीदारांना भाजपमधून काढून टाकण्यात आले. यांनी 2017 मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता.
उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या तिसहजारी कोर्टाने हा निकाल सुनावला आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी गेल्या आठवड्यातच या संदर्भातील निर्णय राखून ठेवला. या खटल्याची सुनावणी आज दिल्लीच्या कोर्टात झाली.
काय होते संपूर्ण प्रकरण ?
गेल्या वर्षी कुलदीपसिंग सेंगर यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. असे म्हटले होते की जून 2017 मध्ये सेंगरने तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या म्हणण्यानुसार, बलात्काराच्या वेळी ती अल्पवयीन होती.
पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यास ती स्वत: ला पेटवून घेईल, अशी धमकीही या मुलीने दिली होती. या धमकीनंतर पोलिसांनी सेंगरवर गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याला एप्रिल 2018 मध्ये अटक करण्यात आली होती.